Top News राजकारण

“चंद्रकांत पाटील यांचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आहे आमच्याकडे”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील तुळजापूरमध्ये राहोत किंवा कोल्हापूरमध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आमच्याकडे आहे, असं खुलं आव्हान नवाब मलिक यांनी दिलंय.

भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर आणि कोल्हापूरमध्ये निवडून येण्याचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये निवडणूक घ्या असं सांगतानाच निवडून आलो नाही तर राजकीय संन्यास घेत हिमालयात जाईन असं स्पष्ट केलं होतं.

“दरम्यान तुळजापूर विधानसभा ही भाजपकडे आहे. त्या आमदारांचा राजीनामा घ्या आणि भाजपची हिंमत असेल तर राजीनामा घेऊन चंद्रकांत पाटील यांनी उभं राहून दाखवावं. त्यांना पराभूत कसं करायचं हे दाखवून देऊ,” असं जाहीर आव्हानदेखील नवाब मलिक यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“कांजूरमार्ग कारशेडचं काम थांबवण्याचं भाजपचं कटकारस्थान आहे”

राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्र सरकार करतंय- सुप्रिया सुळे

“घंटी वाजवली, फोनची लाईटही लावली मात्र मोदींनी…”

‘या’ कारणाने सूर्यकुमारला टीम इंडियात जागा नाही; रवी शास्त्रींनी सोडलं मौन

कंगणा राणावत आणि रंगोलीला मुंबई पोलिसांकडून समन्स; 10 नोव्हेंबरला हजर रहावं लागणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या