मुंबई | वीजबिलात ग्राहकांना सवलत देण्यास ठाकरे सरकारने नकार दिला आहे. या मुद्द्यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
यावर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केले आहे. ते म्हणाले की, “जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण ‘लाथो के भूत बातों से नही मानते'”.
वीज बिलाच्या मुद्यावरुन आतापर्यंत निवेदन, अर्ज बैठका, विनवण्या हे सगळे उपाय करुन झाले तरीही सरकार ढिम्म असल्याचेही संदिप देशपांडे म्हणाले आहेत.
दरम्यान, 69 टक्के बिल वसूली पूर्ण झाली असून आता सवलतीचा विषय बंद झाला आहे. महावितरण 69 हजार कोटीच्या तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण”लाथो के भूत बातों से नही मानते”
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 19, 2020
महत्वाच्या बातम्या-
आटपाडीत संजयकाका-पडळकर गटात मारामारी
वीजबिलांवरून राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केलाय- देवेंद्र फडणवीस
ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘ही’ केली मागणी
“अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली, तेच आता इतरांना शिकवत आहेत”
पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा- नारायण राणे