Top News नागपूर

चीनशी लढा देण्यासाठी आपल्याला ताकद आणखी वाढवावी लागणार- मोहन भागवत

नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडला. अवघ्या 50 जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी चीनशी दोन हात करण्यासाठी आपल्याला ताकद वाढवावी लागणार असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी सांगितलंय.

मोहन भागवत म्हणाले, भारताच्या सीमेवर चीनी सैन्याने दमदाटी केली मात्र भारतानेही चीनला प्रत्युत्तर दिलंय. भारतीय सैन्याने आपली ताकद दाखवून दिलीये. नक्कीच यामुळे चीनला धक्का बसला आहे.

ते पुढे म्हणाले, “शिवाय सामाजिक आणि आर्थिक बाजूने चीनवर बहिष्कार घातल्याने चीनला अजून एक हादरा बसला आहे. मात्र चीनशी लढा देण्यासाठी आपल्याला ताकद आणखी वाढवावी लागणार आहे. त्यामुळेच आपण चीनला लढा देऊ शकतो.”

लढा देताना आपल्याला अधिक सतर्क रहावं लागणार असल्याचं देखील मोहन भागवत यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

“आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नाही”

धक्कादायक! बिहार निवडणूकीच्या प्रचारादरम्यान उमेदवाराची गोळ्या झाडून हत्या

एकनाथ खडसेंचं ‘ते’ वक्तव्य पटण्यासारखं नाही- रावसाहेब दानवे

“तंत्रमंत्र आणि जादूटोण्याच्या मदतीने लालूू यादव यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या