“महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटांसाठी झगडावं लागतंय”; ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल
मुंबई | सध्या बाॅलिवूडबरोबरच मराठी चित्रपटाचांही जोरदार डंका सुरु आहे. मात्र मागील काळात मराठी चित्रपटांना हवा तसा गल्ला कमावता आला नाही. त्यामुळे नेहमीच याविषयी काही कलाकारांकडून खंत व्यक्त केली जाते. अशातच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होत आहे.
मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही, अशा आशयाची पोस्ट करत अभिनेता अक्षय वाघमारे यानं जाहीर निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट शेर शिवराज हा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. महाराष्ट्रातील जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छिते पण तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात नाही, असं अक्षयनं म्हटलं आहे.
सगळे प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहेत या सगळ्याचा विचार कोण करणार ??, असा हल्लाबोल अक्षयनं पोस्टमधून केला आहे.
अक्षयनं पोस्टमध्ये पुढे म्हटलं की, आपल्याच राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असेल तर या संदर्भात आवाज उठवायला नको का?? नाही तर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करतांना निर्माते देखील 10 वेळा विचार करतील आणि अनेक लोक बेरोजगार होतील. त्यामुळे आता पुन्हा एक नवा वादंग निर्माण झाला आहे.
पाहा पोस्ट –
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या –
Mumbai Local: रेल्वे प्रवाशांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!
काँग्रेसने राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचे ताजे दर
राज ठाकरेंच्या सभेआधी भीम आर्मी आक्रमक, दिला ‘हा’ गंभीर इशारा
संतापजनक! मदतीसाठी पोलिसांकडे गेलेल्या महिलेसोबत घडलं असं काही की….; पाहा व्हिडीओ
Comments are closed.