Top News महाराष्ट्र मुंबई

“आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही”

मुंबई | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढल्या. महाविकास आघाडी एकत्र लढली आणि अनपेक्षित असा विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपला जबरदस्त धोका बसला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असून तरीदेखील जे निवडणूक जिंकले आहेत त्यांना शुभेच्छा. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटतेय. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा निवडून आली नाही, असं म्हणत  देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या निकालांनंतर जसं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, तसंच ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा आली नसल्यामुळे त्यांनीही आत्मचिंतन करावं, असा खोचक सल्ला फडणवीसांनी शिवसेनेला दिला आहे.

दरम्यान, तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं. आता आम्हाला त्यांची ताकद समजली आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू, असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

14-15 डिसेंबरला मुंबईत होणार हिवाळी आधिवेशन!

“हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती”

‘हिंमत असेल तर एकएकटे लढा’; सत्ताधाऱ्यांना आव्हान देणाऱ्या पाटलांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले…

‘चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा’; विजयी उमेदवार अरूण लाड यांचा टोला

आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारलं आहे- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या