Top News

चंद्रकांत पाटलांना झाली उपरती… म्हणाले, म्हणून 12 कोटींचं सरकार गेलं!

मुंबई | आपण एकोप्याने वागलो नाही, त्यामुळे 12 कोटींचं सरकार गेलं. तसेच 50 जागा आपल्या हातून गेल्या, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटील एका कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांशी बोलत होते.

भाजपमध्ये एकोपा नव्हता त्यामुळे 50 विधानसभेच्या जागांवर आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. आपल्यात एकोपा नव्हता त्यामुळे आपलं सरकार राज्यात येऊ शकलं नाही. आपल्यातला एकोपा कमी पडला, असं पाटील म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीचं सरकार जास्त काळ टिकणार नाही. मात्र, हे सरकार जितके दिवस राज्य करत आहे तितक्या दिवसात महाराष्ट्राची वाट लावेल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होता. सर्वात मोठा पक्ष ठरुनदेखील भाजपला राज्यात सत्तास्थापन करता आली नाही. शिवसेनेनं भाजपसोबत काडीमोड करण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी केली.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या