बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शमी आम्ही तुझ्यावर प्रेम करतो’; शमीवर टीका करणाऱ्यांना दिग्गजांनी झापलं

नवी दिल्ली | भारत पाकिस्तान सामना 24 ऑक्टोबरला पार पडला आहे. पाकिस्ताननं 10 गडी राखत भारताचा पराभव केला आहे. भारताच्या पराभवानंतर मात्र भारतीय खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात केली. खेळाडूंना त्यांच्या धर्मावरून ट्रोल करण्यात येत आहे. विविध राजकीय नेत्यांनी आणि माजी भारतीय खेळाडूंनी याबाबत ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीत भारताचा पराभव झाला. या लढतीत भारतीय गोलंदाजांनी सुमार कामगिरीचं प्रदर्शन केल्यानं भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रोल करण्यात आलं आहे. शमीला त्याच्या धर्मावरून ट्रोल करण्यात आल्यानं माजी भारतीय खेळाडू चांगलेच भडकले आहेत. भारताचा स्फोटक सलामीवीर माजी खेळाडू विरेंद्र सेहवागनं मोहम्मद शमीची पाठराखण केली आहे.

आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत. शमीला ट्रोल करणं हे माझ्यासाठी धक्कादायक असल्याचं सेहवाग म्हणाला आहे. तर माजी क्रिकेटर हरभजन सिंगनं आम्ही शमीवर कायम प्रेम करतो, असं म्हटलं आहे. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच झापलं आहे. शमी केवळ मुस्लीम असल्यानं त्याला ट्रोल केलं जात असल्याचं ओवेसी म्हणाले आहेत. त्याचसोबत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील शमीला सपोर्ट केला आहे.

दरम्यान, शमी हा भारताचा गोलंदाजीमधील हुकमी एक्का मानला जातो. शमीनं क्रित्येकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. भारतीय क्रिकेमधील आघाडीचा गोलंदाज म्हणून शमीची गणना होते. माझ्यावर टीका झाली पण कधी भारत सोडून जा, असं नाही म्हटलं गेलं अशी खंत यावेळी माजी गोलंदाज इरफान पठाण यांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या 

”ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल करणार’; नितेश राणेंचा थेट इशारा

अफगाणिस्तानवर पुन्हा संकट! संयुक्त राष्ट्र संघाने दिला ‘हा’ गंभीर इशारा

“जातीचा बोगस दाखला दाखवून समीर वानखेडेंनी नोकरी मिळवली”

इंग्लंडचा तारणहार आला! ‘या’ धाकड खेळाडूचं लवकरच संघात पुनरागमन

“देवेंद्र फडणवीसांच्या काळात कायद्याचा धाक होता, तेव्हा…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More