बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धवजी, तुमचं आमचं जमत नसेल तर सोडून द्या, सरकार तुम्हाला… “

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. विरोधी पक्षाकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यातच नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागतो आहोत. शरद पवार म्हणतात देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात देणार नाही. उद्धवजी तुमचं आमचं जमत नसेल तर सोडून द्या, तुम्ही सरकार चालवताय. तुम्हाला सरकार लखलाभ असो. मात्र, एकदिवस तुम्हाला बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

मुंबईचे चिथडे चिथडे उडवणारा मंत्रिमंडळात होता तेव्हा तुम्ही काय केलं ?, असं बाळासाहेब विचारतील. आम्ही सांगू बाळासाहेब आम्ही संघर्ष केला. आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते, सत्तेसाठी आंधळे झाले होते. ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. राजीनामा मागितला तर सरकार जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. राजीनामा मागितला तर त्यांना सरकार पडण्याची भीती वाटत होती, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

दरम्यान, अनिल देशमुखांचा राजीनामा घेता, संजय राठोडांचा राजीनामा घेता मग दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालतं का? तुम्ही कोणाच्या दाढ्या कुरवाळताय हे समजलं पाहिजे. तुम्हाला राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही संघर्ष करत राहणार, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मलिकांविरोधात ईडीजवळ पुरावे, दाऊदच्या माणसाचा राजीनामा घेतलाच पाहिजे”

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या ताब्यात

“आज माझा विधिमंडळात होता फेर फटका, कारण मला द्यायचा आहे महाविकास आघाडीला झटका”

“शरद पवारांनी वर्षानुवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय”

“सरकार आणखी खोलाशी जाईल आणि दुसरा पेनड्राईव्ह घेऊन समोर येईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More