बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आम्हाला हनीमूनला जाण्यासाठी ई-पास हवाय!’

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. अशातच महाराष्ट्रात ब्रेक-द-चेन अंतर्गत संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी लोकांना ई-पास अनिवार्य असून या ई-पाससाठी लोकांची कारणं ऐकून मुंबई पोलीस हैराण झाले आहेत. यामध्ये हनीमूनला जाण्यासाठी देखील ई-पासची मागणी अनेकांनी केली आहे.

22 एप्रिलपासून अतिरिक्त कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार, अशा अनेक प्रकारच्या अत्यंत महत्वाच्या कारणांसाठी लोकांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. यानंतर 23 एप्रिलपासून प्रवासासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे.

ई-पाससाठी लोक वैद्यकीय आणि अंत्यसंस्काराची मोठ्या प्रमाणात कारणे देताना दिसले. तर काही ठिकाणी लग्नासाठीच्या कारणाचाही समावेश होता. तसेच हनिमूनला जायचे आहे, घर शिफ्टिंग तसेच प्रेमप्रकरणाचे काही किस्सेही समोर आले. मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 1 लाख 53 हजार 811 अर्ज आले. त्यापैकी फक्त 54 हजार 823 अर्ज मंजूर करण्यात आले. बहुतांश अर्ज कागदपत्रांंअभावी रद्द केले.

दरम्यान, जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी अनेक जण वैद्यकीय तसेच नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासारखी विविध कारणे देताना दिसले. यात मे महिना असल्याने लग्न समारंभाची सर्वाधिक कारणे समोर आली.

थोडक्यात बातम्या-

‘या’ लोकांना लाँग कोविडचा अधिक धोका; संशोधनातून नवी माहिती समोर

“लाॅकडाऊन अजून पुर्णपणे उठला नाही, कोरोना वाढल्यास जनता जबाबदार राहील”

लातूरमधील 36 वर्षीय तरूण उद्योजक संगमेश्वर बोमणे यांचं कोरोनाने निधन!

‘या’ चित्रपटासाठी आमिर खानने चक्क 12 दिवस केली नव्हती अंघोळ!

कोरोनावर मात करत वसईतील 25 वर्षीय तरुणानं माऊंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More