Top News महाराष्ट्र मुंबई

आपण बेसावध न राहता सावधगिरी बाळगण्याची गरज- उद्धव ठाकरे

मुंबई | संपूर्ण राज्यात कोरोनाचे लसीकरण वेगाने सुरू आहे. ब्रिटन, ब्राझील सारख्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असुन मृत्यु होत आहेत. यामुळे आपण बेसावध न राहता सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना सादरीकरणाच्या वेळी सांगितलं आहे.

आरोग्य विभागाचे सचिव डॅा. प्रदीप व्यास यांनी सांगितलं की, युकेमध्ये 20 जानेवारील एकाच दिवशी 1820 मृत्यु झाले तर ब्राझील मध्ये दररोज 1 हजार मृत्यु होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा संसर्ग केवळ पसरतच नसुन त्यामुळे 40 टक्के जास्त मृत्यु होऊ शकतात.

कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आपण लसीकरण सुरू केलं असलं तरी आरोग्याचे नियम पाळले पाहिजेत. आपण महाराष्ट्रात काही व्यवहार सुरू केलं असलं तरी सर्व निर्बंध आपण उठवणार नसून काळजीपूर्वक जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं आहे.

दरम्यान, परदेशातून येणारे प्रवासी महाराष्ट्रात येत आहेत, याबाबत केंद्राला पत्रव्यवहार केला असल्याचंही मुख्यमंत्र्यानी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच, या नेत्याची होऊ शकते निवड!

“बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणं आणि स्मारक न बांधणं याला टाईमपास बोलतात”

“जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची”

महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; ते पद आता कुणाकडे जाणार?

“आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने करभार करतोय, विरोधकांनी लावालावी करू नये”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या