बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मी नव्या मंत्र्यांचं अभिनंदन केलं नाही- पंकजा मुंडे

मुंबई | मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या. आम्ही कधीच मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. भाजपच्या कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नाही, असं सांगत पंकजा मुंडे यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नवनिर्वाचित मंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही याचंही कारण सांगितलं. परवा केवळ संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठोस काही येत नव्हतं. त्यामुळे मी कुणाचंही अभिनंदन केलं नाही. मात्र, आता मी केंद्रीय मंत्र्यांचं अभिनंदन करते. राज्यातून मंत्री झालेल्यांचंही अभिनंदन करते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी भारती पवार आणि कपिल पाटील यांच्याशीही मी फोनवरून चर्चा केली. त्यांचं अभिनंदन केलं. तसेच भागवत कराड यांनी मला रात्री साडेबारा वाजता फोन केला होता. त्यांना दिल्लीतून फोन आल्याचं आणि दिल्लीला जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतंही पद द्यायचं असेल तर मुंडे कुटुंबाचं नाव चालतं. त्यामुळे आमचं नाव चाललं. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती, असं पंकजा यांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या- 

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज का?; पंकजा मुंडे म्हणाल्या…

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वाद?; नितीन राऊत, बाळासाहेब थोरात अचानक दिल्ली दरबारी

“पंकजाताई, ओबीसी जनगणनेच्या मागणीमुळे तुम्हाला मंत्रिपद दिलं नाही”

भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार!

“पाकिस्तानात 58 रूपये लीटर पेट्रोल असताना भारतात 106 रूपये का ?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More