बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे आपण कोरोना संकटावर मात केली”

मुंबई | शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना चंद्रकांत खैरेेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे आपण कोरोना संकटावर मात केली, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

कोरोनच्या संकट काळात त्यांनी केलेल्या कामामुळे जनता फिरू शकत आहे. मी मराठवाड्यात दौरे करतो. त्यावेळी जनता उद्धव ठाकरेंचं कौतुक करताना दिसते. विरोधी पक्ष नेते काही बोलत आहेत, त्यांना बोलू द्या. पण कोरोनामध्ये जनतेला वाचवण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, असं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.

मराठवाड्यातले आम्ही शिवसैनिक निजामाचे अत्याचार सहन करत आम्ही पुढे आलो आहोत. शिवसेनाप्रमुखांचा 1988ला मराठवाड्याला पदस्पर्श लागला आणि संपूर्ण चित्र बदललं. संपूर्ण मराठवाडा शिवसेनामय झाला आहे, असं खैरेंनी सांगितलं. तसेच शिवसेनेने राम मंदिराच्या जमीन घोटाळ्यावर टीका केली नाही. आम्ही फक्त सत्य बाहेर आलं पाहिजे, असं म्हटलंय. मी स्वत: राम मंदिरासाठी एक लाख 111 रुपयांची देणगी दिली आहे. शिवसेनेने एक कोटीचा निधी दिला आहे, असंही चंद्रकांत खैरेंनी सागितलं.

आम्ही कधीही हिंदुत्व विसरत नाही. आमचे हिंदुत्वाचे कार्यक्रम चालू आहेत. हिंदुत्व आमचा श्वास आहे. आम्ही कधीही हिंदुत्व सोडणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्वाबद्दलचं मार्गदर्शन आणि त्यांचं वाक्य आमच्या मनावर कोरलं आहे. मी शिवसेनेच्या तिसऱ्या पिढीसोबत काम करत आहे. बाळासाहेबांचे बाळकडूचे आमच्यावर संस्कार झाले आहेत, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“निलेश राणे, नितेश राणे काहीच करू शकत नाही, कोणामुळे मोठे झालात हे विसरू नका”

“महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशान स्विकारलंय; मोदींनंतर ठाकरे हाच राष्ट्रीय ब्रँड”

राहुल गांधी प्रामाणिक आणि उमदं नेतृत्व, त्यांचं स्वप्न साकार होवो- संजय राऊत

“कोरोनाची तिसरी लाट पुढील 6 ते 8 आठवड्यात येण्याची शक्यता”

“बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न शिवसेनेनं पूर्ण केलं; त्यांच्याच विचारधारेवर शिवसेना पुढे जातीये”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More