बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही बोललो की शरद पवारांचे चमचे आहेत, हे काल पक्षात आलेले…”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी बोलताना शरद पवारांवर टीका करताना जे शब्द वापरले जात आहे त्याविषयी खंत व्यक्त केली आहे. काल पक्षात आलेले लोक शरद पवारांविषयी जे बोलतात ते फडणवीस, गडकरी, मोदी यांना मान्य आहे का?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

शरद पवार यांना टार्गेट केलं जात असून बदनाम केलं जात आहे. राजकीय मतभेद असू शकतात. मात्र, ज्या पद्धतीची भाषा शरद पवारांसारख्या उत्तुंग नेत्याविषयी वापरण्यात येत आहे. आम्ही काही बोललो की, शरद पवारांचे चमचे म्हटलं जातं. या महाराष्ट्राच्या लोकांचा सन्मान राहिला पाहिजे. ज्यांनी संसदीय लोकशाहीत 50-55 वर्षे घातली त्यांच्याविषयी भाजपचे लोक कोणती भाषा वापरत आहेत?, असा सवाल राऊतांनी केला आहे.

राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्यावर जास्तीत जास्त एकमत करून सभागृहाचे कामकाज पुढे नेले पाहिजे. देशात अनेक मुद्दे हे निवडणुकीच्या आधी जीवंत केले जातात. हिजाबचा मुद्दाही आला होता. काश्मीरपासून ते पाकिस्तानपर्यंत अनेक मुद्दे येतात. त्यामुळे निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. अलीकडच्या काळात धार्मिक मुद्यांवरच जास्त जोर दिला जातं आहे, असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान हे एका पक्षाचे नसतात हे त्यांना समजायला हवं. पंतप्रधानांची गेल्या काही दिवसांतील भाषण ऐकली तर त्यांनी या चक्रातून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. मी देशाचा नेता आहे. हे त्यांनी स्वत:ला बजावलं पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

बॉम्ब कुठं आहे?’ विचारत धनंजय मुंडेंनी थोपटले दंड, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक! कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ‘या’ ठिकाणी लाॅकडाऊन जाहीर

मुंबईतील पेपरफुटी प्रकरणावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

…अन् भररस्त्यात मुलींची तुंबळ हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More