बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या आव्हानाला आपण सर्वांनी संधी म्हणून पाहिले पाहिजे- भगतसिंग कोश्यारी

पुणे |  महाराष्ट्र राज्यात सगळीकडे कोरोनाचा फैलाव होत आहे. त्याचबरोबर बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे, त्यामुळे लोकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर कोरोना महामारीच्या या आव्हानाला आपण सर्वांनी संधी म्हणून पाहिले पाहिजे, असं मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे.

गुरुवारी पुणे विद्यापीठाचा 117 वा पदवी प्रदान सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडला. नविन शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय शिक्षणाची एक सर्वोत्तम संकल्पना आहे. या संकल्पनेला प्रोत्साहन दिले गेल्यास विद्यार्थांना सर्व विद्याशाखांमधील ज्ञान मिळू शकते. शिवाय एखादा विद्यार्थी त्याला हवे त्या विषयामध्ये स्पेशलायझेशन करु शकतो, असं भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय योग्य आहे. तसेच आपण सर्वांनी कोरोना संकंट काळात समर्पणाच्या भावनेतून काम केल्यास आपण नक्कीच कोरोना संकटाला हरवू शकतो, असंही भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुणे विद्यापीठाच्या 2018-19 या शैक्षणिक वर्षात पदवी व पदव्युत्तर झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रमाणपत्रं प्रत्येक विद्यार्थ्यांना घरी कुरिअरद्वारे पाठवण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

घरी बसून महिलांना फावल्या वेळात काम करण्याची संधी मिळणार!

पुणे, मुंबईच्या वैद्यकीय प्रवेशाचा कट ऑफ वाढणार!

पुण्यातील तात्पुरत्या कारागृहातून 2 कोरोनाबाधित कैद्याचं पलायन

बालिका वधू फेम सुरेखा सिक्री यांची प्रकृती चिंताजनक

…म्हणून कंगणाच्या आईने मानले अमित शहा यांचे आभार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More