‘सोनिया गांधी, राहुल गांधी असोत किंवा संजय राऊत…’; ईडी चौकशीवरून राऊतांचं मोठं वक्तव्य
मुंबई | शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचनालयाने (ED) पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौथ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांना देखील सक्तवसुली संचनालयाने नोटीसा बजावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय तपास यत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांवर (Central Investigation Agencies) भाजपचा आणि केंद्र सरकारचा दबाव असून संविधानाच्या (Constitution of India) रक्षणासाठी आपल्याला मोठा लढा द्यावा लागेल, असे संजय राऊत म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यावर राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत? हे आपल्या सगळ्यांना माहित आहे.
विरोधी पक्षातील कोणताही नेता किंवा व्यक्ती देश हिताबद्दल बोलतो, किंवा प्रश्न विचारतो, तेव्हा त्यांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा फास टाकला जातो. सोनिया गांधी असोत, राहुल गांधी असोत किंवा संजय राऊत असो. जो प्रश्न विचारतो त्याला चौकशीसाठी बोलावले जाते, दहशत निर्माण केली जाते, तुरुंगात पाठविले जाते. पण आम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राऊतांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती दौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांच्यासारख्या तळागाळातील एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्चपदी निवडून आल्या त्याचा आनंद आहे. राष्ट्रपतीबाई या देशाच्या संविधानाच्या रखवालदार आहेत, घटनात्मकप्रमुख आहेत. त्यामुळे घटनेची पायमल्ली होणार नाही, न्यायाचे राज्य राहील यांची त्यांच्यावर जबाबदारी आहे, असे राऊत म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
दौपदी मुर्मूंवरील ‘त्या’ टीकेमुळे भारती पवार संतापल्या, म्हणाल्या…
राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी
‘… नाहीतर आम्ही एकमेकांचा जीव घेतला असता’, नागा चैत्यन्यसोबतच्या घटस्फोटावर समंथा स्पष्टच बोलली
जम्बो कोविड सेंटरबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय
‘…त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची का?’, सुहास कांदेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल
Comments are closed.