बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही वाघाच्या काळजाचे, शिवसेना प्रताप सरनाईकांच्या पाठिशी ठाम उभी”

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली होती. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

प्रताप सरनाईक आणि त्यांचं कुटुंब त्रासात आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन त्रास देतंय त्यामुळे भाजपशी जुळवून घेण्याचं वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पण एक पक्ष म्हणून भूमिका घेण्याचे सर्व अधिकार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. आमच्यात कोणतीही गटबाजी वगैरे नाही. आमच्यात फक्त एकच गट आहे आणि तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गट, असं संजय राऊत म्हणाले.

राज्यात पाच वर्ष ठाकरे यांच्या नेतृत्वातच सरकार उत्तम काम करणार, कुणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी उत्तम समन्वयानं काम करत आहे.  प्रताप सरकारनं शिवसेनेच्या कुटुंबाचे महत्वाचे सदस्य आहेत आणि आमचं शरीर व काळीज दोन्ही वाघाचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी ठाम उभा आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरनाईक जे आता सांगत आहेत, तेच तर आम्ही 18 महिन्यांपूर्वी सांगत होतो. पण तेव्हा तुम्ही ऐकलं नाही. आम्ही सकारात्मक बोलल्यास लगेच सामनामध्ये अग्रलेख येईल. सत्ता नसल्यानं यांच्या पोटात दुखत असल्याची टीका होईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

“दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचं हेच आपलं लक्ष्य”

काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली तर…- जयंत पाटील

18 वर्षावरील सर्वांचं आजपासून मोफत लसीकरण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

शरद पवार दिल्लीला रवाना; विरोधी पक्षातील विविध नेत्यांना भेटणार

“मागास रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा, पन्नास टक्के मर्यादेचा मुद्दा संपुष्टात येईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More