बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांच्याच मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरु- नाना पटोले

अकोला | शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वेळोवेळी वाद उद्भवताना दिसतो. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शिवसेनेच्या जवळ जात असल्याचं दिसत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात अंतर वाढल्याचं चित्र आहे. शिवसेना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका करताना दिसत आहे. त्याचबरोबर सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना काँग्रेसला सल्ले देत असल्याचं देखील दिसतंय. यावरून आता नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.

राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही. काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असा सल्ला शिवसेनेने काँग्रेसला दिला होता.

संजय राऊतांच्या मार्गदर्शनातच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडूनच आम्ही शिकत असतो. तेच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात, अशा कानपिचक्या नाना पटोले यांनी घेतल्या आहेत. तर आम्हाला भाजपकडून काहीच शिकण्याची कोणतीच गरज नाही असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकार सध्या अडचणीत सापडलं आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा विषय गरम असताना, काँग्रेसने पदोन्नतीतील आरक्षणावरूण आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याचं सांगितलं जातयं.

थोडक्यात बातम्या-

“चीनच्या कपटनीतीवर लक्ष ठेवावंच लागेल, गाफील राहून चालणार नाही”

पुण्याचा श्वास आणखी थोडा मोकळा होणार; वाचा 14 जूनपासून काय सुरु, काय बंद?

सहकारमहर्षी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव तुकाराम नाडे यांचं निधन

“काँग्रेसमध्ये आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल”

कौतुकास्पद! कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा जगताप दाम्पत्याचा निर्णय

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More