नवी दिल्ली | लष्कर हे नेहमी राजकारणापासून दूर असते, आम्ही फक्त सत्ताधाऱ्यांच्या आदेशानुसार काम करत असतो, असे वक्तव्य देशाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावतांनी केलं आहे. देशाच्या संरक्षण प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर आज (बुधवारी) ते पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काही दिवसांपूर्वीच बिपीन रावत यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आंदोलनकर्त्यांना लक्ष केलं होतं. नेते हे चुकीच्या दिशांकडे वळवणारे नसतात. शहरामध्ये महाविद्यालयात, विद्यापीठात आपण विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन पाहतोय, काही नेते याचं नेतृत्व करताना दिसतायेत. अशी टीका त्यांनी नाव न घेता नेत्यांवर केली होती.
दरम्यान, आम्ही तुम्हाला युद्ध कसं करावं हे सांगत नाही, त्यामुळे लष्कर प्रमुखांनी आम्हाला राजकारण कसं करावं हे शिकवू नये, असं सूचक उत्तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी बिपीन रावतांना दिलं होतं.
चिदंबरम यांच्या या वक्तव्यावर रावत यांनी आता भाष्य केलं आहे. लष्कर हे नेहमी राजकारणापासून दूर राहत असते. आम्ही सत्ताधाऱ्यांच्या आदेशानुसार कार्यरत असतो, असे रावत म्हणाले. कोणताही निर्णय घेताना तिन्ही दलांशी चर्चा केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
“देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती समजू शकतो, त्यांना दुसरं काही काम नाही” – https://t.co/wfNcKgXQAt @Jayant_R_Patil @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
हार्दिक पांड्यानं दिली आपल्या प्रेमाची कबुली; पाहा कोण आहे ती… – https://t.co/nSM5xHFr2G @hardikpandya7 @Natasastankovic #HardikPandya
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
“शिवसेनेचं म्हणजे दिवसा शेर आणि रात्री ढेर”- https://t.co/dTt3QniXW0 @OfficeofUT
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
Comments are closed.