बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विधानसभेच्या अध्यपदासाठी आमचा काँग्रेसला पाठिंबा”

मुंबई | नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. विधानसभेचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली होती. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या यासाठी जोरबैठका सुरु झाल्या आहेत. यामध्ये आता काँग्रेसशिवाय इतर पक्षाकडे पद दिलं जाणार का? याविषयी तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र हे पद काँग्रेसकडेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा पाठिंबा काँग्रेसला आहे. याचा पुनरुच्चार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी केला आहे. एकदा का या पदासाठी काँग्रेसने उमेदवार निश्चित केल की, हा विषय वेगाने पुढे सरकू शकेल, असं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे. नाना पटोले आणि उर्जामंत्री नितीन राऊत हे दोन काँग्रेसचे नेते विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. पण तिसऱ्याच नेत्याला संधी मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

अध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराबद्दल काँग्रेसने निर्णय घेतला की, तीन पक्षांचे नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील, असं मला वाटतं, असं शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सहजपणे काम करीत असून ते त्याची मुदत पूर्ण करतील, असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 2019 मध्ये भाजपला डच्चू देऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर सत्ता वाटपाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पद शिवसेनेला जाणार असल्यानं उपमुख्यमंत्रीपद आणि विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू होती. त्यानंतर अखेर काँग्रेसला विधानसभेच्या अध्यक्षपदावर समाधान मानावं लागलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“आता वाटायला लागलय मुख्यमंत्र्यानाच तिसरी लाट हवी आहे”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्‍णालयात दाखल

‘…त्यामुळे ईडीने माझ्या विनंतीचा विचार करावा’; अनिल देशमुखांचं ईडीला पत्र

नशिबाचा खेळ! लग्नाला जाणारी वऱ्हाडीची गाडी कोसळली थेट दरीत

अबब ! रोहित शर्माच्या विकेटसाठी ‘टीम साऊथी’ने … ; शेन जर्गेसनचा मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More