Top News राजकारण

आम्ही सुपारी घेणारे, मग तुम्ही हप्ते घेणारे आहात का?; मनसेचा शिवसेनेला सवाल

मुंबई | शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी मनसेवर टीका केली होती. मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करु शकत नाही असा टोला त्यांनी लगावला होता. याला आता मनसेने देखील प्रत्युत्तर दिलंय.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधलाय. आम्ही सुपारी घेणारे आहोत, मग तुम्ही काय हप्ते घेणारे आहात का? असा खरमरीत सवाल नांदगावकर यांनी केलाय.

बाळा नांदगावकर म्हणाले, “अनिल परब आणि माझा प्रवास अगदी सारखाच झालेला आहे. त्यामुळे कोण काय काय करतं याबद्दल मला चांगलंच माहिती आहे. जाऊन केबल वाल्यांना विचारुन घ्या, मग कळेल.”

त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका निवडणूकीत भाजपासोबत युती करायची की नाही याबाबत पक्षप्रमुख राज ठाकरे सांगतील. पक्षप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही त्याचं स्वागतच करतो. मात्र सध्या एकला चलो रे अशीच आमची भूमिका आहे, असंही मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलंय.

महत्वाच्या बातम्या-

चंगू मंगूच्या फालतू गप्पा, फुकट्या लोकांना बघायला इंटरेस्ट नाही; मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर निलेश राणेंची टीका

पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण

जास्त अंगावर आलात तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

“गरज पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू”

फुटबॉलचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे दिएगो मॅराडोना यांचं निधन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या