बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्हाला फक्त विदुषक हवाय; शरद पवारांचा ‘या’ नेत्याला टोला

मुंबई | भाजप नेते आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सर्कस म्हणून संबोधलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत त्यांचा समाचार घेतला आहे.

आमच्या सर्कसमध्ये सर्व प्राणी आहेत, विदुषकाची कल्नाही आहे. पण विदुषकाची मात्र कमतरता आहे, या शब्दांत त्यांनी राजनाथ सिंहांना उत्तर दिलं आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणातील काही गावांना शरद पवार यांनी भेट देऊन नुकसानी पाहणी केली, यानंतर ते बोलत होते.

राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे नुकताच महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती, महाविकास आघाडीला त्यांनी सर्कस म्हटलं होतं.

दरम्यान, शरद पवार यांच्यासोबतच शिवसेनेनंही राजनाथ सिंह यांना प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सरकारचं काम अगदी सुसूत्रतेने सुरु आहे. उलटपक्षी मध्य प्रदेश, गुजरातमध्येच सर्कस सुरु आहे. सोबतच लडाखच्या मुद्द्यावरही केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावं, असं शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ सचिन वाझे 16 वर्षांनंतर पुन्हा पोलिसात दाखल, इथं आहे नेमणूक!

….म्हणून मला शिवभक्तांचा सार्थ अभिमान, त्यांच्या समोर मी नतमस्तक- छत्रपती संभाजीराजे

महत्वाच्या बातम्या-

भारत-चीनमधील तणाव निवळला; दोन्ही देशांनी सैन्य माघारी बोलावलं

‘निसर्ग’मुळे कंबर मोडलेल्या कोकणवासियांना शरद पवारांनी असा दिला धीर

रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री…; राष्ट्रवादीचं राजनाथ सिहांना सणसणीत प्रत्युत्तर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More