बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्हाला ते पूर्वीचं वारकऱ्यांनी तुडुंब भरलेलं आनंदी पंढरपूर पहायचंय”

पंढरपूर | आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली. पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी मुख्यमंत्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आले होते. त्यांनंंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रथम विठ्ठलाची आणि त्यानंतर रुक्मिणी मातेची षोडशोपचार पूजा पार पडली. त्यावेळी कोरोना संकट लवकरात लवकर दूर व्हावं, असं साकडं देखील त्यांनी विठ्ठलाला घातलं आहे.

‘पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर, आम्हाला पुन्हा आषाढी वारीत तुडूंब भरलेलं पंढरपूर पहायचं आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे’, अशी इच्छा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

‘मंदिरात आल्यावर आपण फक्त विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मुर्तीकडेच पाहतो. या मंदिरात प्रत्येक खांब आणि दगड काही ना काही बोलत असतो’, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यावर्षी केशव कोलते आणि इंदुमती कोलते यांना दाम्पत्याला शासकिय महापूजेचा मान मिळाला आहे. त्यानंतर त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी त्यांनी पंरपरेचा वृक्ष लावला असल्याचं सांगितलं. या पंरपरेच्या वृक्षाची पायेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला अटक, कारण ऐकून हैराण व्हाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न

“दरवर्षी मुंबई तुंबते…तीन पिढ्यांपासून बीएमसी चालवणारं ठाकरे कुटुंब फेल”

“माझ्यानंतर सलमानच्या किती गर्लफ्रेंड होत्या माहित नाही, मी त्याच्या संपर्कात नाही”

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आज नव्या बाधितांची संख्या आली 400 वर

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More