बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्य सरकार केंद्र सरकारसोबत आहे, हे आपल्याला दाखवून द्यायचंय”

मुंबई | राज्यात मंगळवारी मंत्रीमंडळ विस्तार पार पडला आहे. जुन्या मंत्र्यांना पुन्हा नव्याने संधी देण्यात आली आहे. तसेच शिंदे गट आणि भाजप(BJP) यांच्यातील काही नेते मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता नव्या मंत्र्यांची बैठक झाली आणि या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी मंत्र्यांना काही सूचना दिल्या आहेत.

चांगला कारभार करा, तुमच्यावर आमची नजर आहे, हे लक्षात ठेवा. चुकीचे निर्णय घेतले, तर समर्थन करणार नाही. मंत्र्यांनी एकमेकांवर टीका केली तर याद राखा, अशा इशारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मंत्र्यांना दिला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकाऱ्यांना सभागृहाच्या बाहेर जाण्यास सांगितलं आणि मंत्र्यांना अशा सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे गटातील काही नेते मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत, त्यामुळे नाराज झालेल्यांमधील मतभेद कोणत्याही क्षणी बाहेर येऊ शकतात म्हणून शिंदे गटातील मंत्र्यांना आवर्जून शांत राहण्यास सांगितलं आहे. यावरून नवीन सरकारमध्ये काही ताळमेळ नसल्याच्या चर्चा आहेत.

तसेच केंद्र सरकारमुळे (Central Goverment)राज्यात नवे सरकार स्थापन झाल्याची जाणीव या बैठकीत मंत्र्यांना करून देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून मागील अडीच वर्षात केंद्रीय योजनांबद्दल स्मरणपत्रे पाठवण्यात आली, परंतु योजनांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे आता राज्यात केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करून, महाराष्ट्र राज्य केंद्र सरकारसोबत आहे हे केंद्र सरकारला दाखवून द्यायचे आहे, असंही या बैठकीत मंत्र्यांना सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ईडीच्या रडारवर असलेल्या भानवा गवळींनी बांधली मोदींना राखी

आरोप करणाऱ्यांना संजय राठोडांचा गंभीर इशारा, म्हणाले…

वरूण गांधीचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर, ‘या’ मुद्द्यावरून घेतला खरपूस समाचार

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची माहिती समोर

“शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More