मोठ्या मनाचा माणूस! घरकाम करणाऱ्या तरुणीच्या घरी सांत्वनाला पोहोचले जॅकी श्रॉफ
पुणे | बाॅलवूड अभिनेता जॅकी श्राॅफ हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. तसेच पडद्यावर रागीट, हसमुख आणि रोमाँन्टीक अशा विविध कलाकारी सादर करणारा जॅकी श्राॅफ पडद्याबाहेरील आयुष्य अत्यंत साधपणाने जगतो. त्याचा असाच एक अंदाज लोकांना पाहायला मिळाला. जॅकी श्राॅफच्या घरी काम करणाऱ्या तरूणीच्या आजींच निधन झालं ही बातमी समजताच तो सरळ तिच्या घरी पोहचला.
जॅकी श्राॅफचा मावळ मधील चांदखेडमध्ये बंगला आहे. या घराची देखरेख करण्याचं काम दिपाली तुपे ही तरूणी करते. काही दिवसांपूर्वी दिपालीच्या आजी तान्हाबाई ठाकर याचं निधन झालं.
पुण्यातील मावळमधील पवनानगरमध्ये त्याच्या घरी काम करणारी दिपाली ही तरूणी राहत आहे. त्यानंतर त्याने दिपालीच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबाचं सांत्वन केलं. 13 मार्चला जॅकी श्राॅफ त्यांच्या घरी गेला.
आपल्या दुखात जॅकी श्राॅफ सामील झाल्याने ठाकर परिवार भावूक झालं. जॅकी श्राॅफने तिच्या घरच्यांशी विचारपूस केली आहे. त्याच्या या भेटीने ठाकर कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
थोडक्यात बातम्या-
ममता बॅनर्जींचा भाजपवर बूमरॅंग; दिला ‘हा’ मोठा धक्का
मोठी बातमी! पुण्यापाठोपाठ ‘या’ जिल्ह्यातील शाळा देखील 31 मार्चपर्यंत राहणार बंद
“पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या”
धक्कादायक! एकाच कुटुंबातील 5 जणांनी फाशी घेत संपवलं जीवन
‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीये’; सचिन वाझेंच्या व्हाॅट्सअॅप स्टेटसने खळबळ
Comments are closed.