बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे शेतकऱ्यांचं आंदोलन, शिवसेनेचा ‘भारत बंद’ला मनापासून पाठिंबा”

मुंबई | कृषी कायदे मागे घ्यावेत आणि शेतमालाला किमान हमीभाव कायदाच्या मागणीसाठी सुरु असलेला ऐतिहासिक शेतकरी संपाला आता 10 महिने पुर्ण झाले आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांकडून भारत बंदचे आयोजन करण्यात आलं आहे. या भारत बंदला अनेक राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.

आपला पाठिंबा दर्शवताना, गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरु आहे, हा शेतकऱ्यांचा बंद आहे, देशातील नागरिकांची भावना शेतकऱ्यांसोबत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. बेरोजगारीमुळे लोक तसं ही घरात बसलेले आहेत, त्यात शेतकऱ्यांनीही बंद पुकारला, आम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहेत, असा शब्दांमध्ये संजय राऊतांनी आपला पाठिंबा दर्शवली आहे.

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचं अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत अनेकवेळा चर्चा देखील केली, मात्र या सर्व चर्चा विफल गेल्या. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. अशातच कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी देखील शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेस पुढे येण्याचं आवाहन दिलं आहे.

दरम्यान, भारत बंद दरम्यान देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील. मात्र रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

थोडक्यात बातम्या-

दोन वेळा तरी मुख्यमंत्रिपदाची संधी द्यावी- विजय वडेट्टीवार

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अमित शहांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

सोन्याच्या दरामध्ये आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

आईच्या मृत्यूनंतर मुलांनी वडिलांसोबत मिळून बनवलं आईचं मंदिर!

“भरकटलेली वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना नेमकं कुठं जायचं आहे?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More