महाराष्ट्र सातारा

“शिवसेनेच्या पराभवाचीही भरपाई करू”

सातारा | विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही कमी जास्त झालं असलं तरी भविष्यकाळात त्याची भरपाई होणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

पाटील साताऱ्यामध्ये बोलत होते. त्यावेळी पत्रकारांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवाबद्दल प्रश्व केला त्यावर त्यांनी उत्तर दिलं.

महाविकास आघाडीने एकत्र निवडणुक लढवली होती. त्यामध्ये काही ठिकाणी यश आलं तर काही ठिकाणी अपयश आलं. कोणाला काय मिळालं हे तिथल्या स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असल्याचं पाटील म्हणाले.

दरम्यान, आता महाविकास आघाडी सरकारला ‘एकीचे बळ’ लक्षात आलेले दिसत आहे. कारण भाजपला रोखण्यासाठी राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढण्याची तयारी महाविकास आघाडीकडून सुरू करण्यात आली असल्याचं पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

बापरे! हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरने दिल्ली चक्क लाखो रूपयांची टीप

मेसेज आलेल्या व्यक्तीला दिली जाणार कोरोनाची लस; आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

…तर जानेवारीपासून राज्यात लसीकरणाला सुरुवात होईल- राजेश टोपे

‘पगार नाही तोवर काम बंद’, पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या स्टाफचं ‘रास्ता रोको’ आंदोलन

कर्णधार विराट कोहलीच्या नावे नवा विक्रम; धोनीलाही टाकलं मागे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या