Loading...

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळेप्रसंगी कर्ज काढू पण त्यांचं पुनर्वसन करू- चंद्रकांत पाटील

पुणे |  महाराष्ट्रातली पूरपरिस्थिती लक्षात घेता केंद्राकडे 6800 कोटी रूपयांची मागणी केली आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळेप्रसंगी कर्ज काढू पण त्यांचं पुनर्वसन करू, असा शब्द महसूलमंत्री चंद्रकांत पाटील याांनी दिला आहे.

प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला जाईल. त्यासंबंधी प्रशासनाला सूचना केल्या जातील, असं पाटील म्हणाले. ते पुण्यातील शासकिय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

Loading...

राज्यात 4 लाख 53 हजार लोकांना पुरपरिस्थितीतून बाहेर काढलं. चालू परिस्थितीत राज्यात 500 पेक्षा अधिक निवारा केंद्रांवर 3 लाख पेक्षा अधिक पूरग्रस्तांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

दरम्यान, पूरग्रस्तांनी चिंता करू नये. राज्य शासन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-सरकारनं पूरग्रस्तांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली त्याचं कौतुकच पण..- संभाजीराजे भोसले

‘आपला माणूस’ नाना पाटेकर पूरग्रस्तांच्या मदतीला; 500 घरं बांधून देणार

-राधा झाली सौमित्रसाठी बावरी…. दिला लग्नाला होकार

Loading...

-महिला क्रिकेटपटूनं शेअर केला न्यूड फोटो; म्हणते…

-बाळासाहेब थोरातांच्या ‘त्या’ प्रश्नावर भारत भालके झाले निरूत्तर

Loading...