बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार देशाचे पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल”

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जी यांना दमदार विजय मिळवून देणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सिल्वर ओकवर चाललेल्या 3 तासाच्या या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या या अचानक भेटीमुळे केंद्रातील राजकारण आता ढवळणार की काय? अशा चर्चा आता राजकिय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

दोघांच्या या भेटीनंतर शिवसेना खारदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं आहे. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झाली आहे. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल’, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत जाईल, अशी चर्चा काही दिवसांपुर्वी चालू होती. मात्र, राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने भाजपवर कडाडून टीका केली. त्याचबरोबर या वर्धापन दिनी खुद्द शरद पवारांनी शिवसेनेचं तोंडभरून कौतुक केल्यानं या चर्चा थांबल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेनं देखील पवारांचं वारंवार कौतुक केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची चांगलीच जोडी जमल्याचं चित्र समोर येत आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर यांच्यासोबत राज्यात रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे. तर केंद्रात देखील भाजपला समोर एक नवा चेहरा उभा करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता केंद्रात आता सत्ता समिकरणं बदलणार का?  असा नवा प्रश्न राजकीय वर्तुळात उभा राहत आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजपला मोठा धक्का; एका खासदारासह तीन आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत???

‘मी 6 बाॅलवर 6 सिक्स मारले तेव्हा धोनी…’; तब्बल 13 वर्षानंतर युवराज सिंगचा खुलासा

3 जिल्ह्यात अतिवृष्टी तर कोकणातल्या या जिल्ह्यात ढगफुटीची शक्यता, घराच्या बाहेर पडत असाल तर सावधान!

“भाजपमध्ये गेलेले पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक, माझ्याकडे काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची मोठी यादी”

संजय राऊतांच्याच मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरु- नाना पटोले

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More