बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केल्यास कोणताही दुष्परिणाम होणार नाही”

औरंगाबाद | मराठा आरक्षणाचा तेढ कायम असतांना मराठा नेते विनोद पाटील यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केल्यास आम्हाला आनंदच होईल. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाही, असा दावा विनोद पाटील यांनी केला. विनोद पाटील यांच्या या भूमिकेमुळे आता मराठा आरक्षण आंदोलनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

मराठा समाज हा पूर्वीपासूनच कुणबी म्हणून ओबीसीमध्ये समाविष्ट आहे. विदर्भ, खानदेश आणि कोकणात मराठा कुणबी समाजाचा ओबीसीत समावेश झाला आहे. त्यामुळे बाकी मराठा समाजाचाही सरकार जर ओबीसीत समावेश करणार असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. समाजाला ओबीसीत समाविष्ट केल्यामुळं कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत. तर, तसं होऊ न देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असं विनोद पाटील यांनी मंगळवारी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नका. नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील, असं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून मांडण्यात आलं आहे. ओबीसी महासंघानं यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण पारित केल्यानंतर आता ओबीसीमध्ये मराठ्यांना सामावून घेण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत हे करू नका. ओबीसी समाजाची तात्काळ जनगणना करा. अनेक ठिकाणी 19 टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे. राज्य सरकारनं याकडं गांभीर्यान पाहवं. नाहीतर ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी महांसघाने दिला आहे.

थोडक्यात बातम्या –

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; जाणून घ्या

कौतुकास्पद! 5 रूपयांसाठीच्या अपमानामुळे आज ‘ती’ करतीय लोखोंचा व्यवसाय

धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून आईने केली पोटच्या पोराची हत्या

धक्कादायक! अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकूने हल्ला

‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या ‘या’ लुकने चाहते घायाळ, पाहा फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More