बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना थेट आव्हान, म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊन बरेच दिवस झाले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) खातेवाटप करू शकले नाहीत. यावरून शिवसेना(Shivsena) आणि शिंदे गट यांच्यात टोलेबाजी सुरू आहे. त्यातच आता शिनसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut)यांनी महाराष्ट्रात(Maharashtra) पुन्हा सत्तेचा दावा केला आहे.

आम्हाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करायची आहे, पण कोणत्याही मार्गाने नाही. आम्ही लोकशाही मार्गाने सत्ता आणू, असं मत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. शिंदे गट कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहे. त्यांना काय अधिकार आहे. हा सगळा पोरखेळ चालला आहे, त्याकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही. ज्या झाडाच्या सावलीत मोठे झाले, फळे खाल्ली, त्या झाडापासून तुम्ही वेगळे झाले आहात. त्यामुळे तुम्ही आता दुसरा पक्ष स्थापन करावा आणि मग आपले अस्तित्व दाखवावे, असं म्हणत शिंदे गटाला राऊत यांनी चांगलचं सुनावलं.

लिलाधर डाके(liladhar dake) आणि मनोहर जोशी( Manohar Joshi) यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. ते दोघे कट्टर शिवसैनिक आहेत. अनेक वादळांमध्ये ते शिवसेनेच्या ठामपणे उभे राहिले. एकनिष्ठता काय असते, हे शिंदेंनी या दोघांकडून शिकावे अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली.

दरम्यान, महाराष्ट्रात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेते सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यात आता दिल्लीच्या वाढत्या वाऱ्यातून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे. यावर टीका करण्यासारखे काही नाही, असंही संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘आम्ही तहान लागल्यावर विहीर खोदत नाही’,अजित पवारांचा शिंदे सरकारवर प्रहार

“मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर आनंद, मी टेबलावर उभा राहून स्वागत करेन”

‘अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा’, गोपीचंद पडळकरांची मोठी मागणी

RBI च्या गव्हर्नरला महिन्याला मिळतात ‘इतके’ लाख, मानधन वाचून थक्क व्हाल

…तर कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो, चुकूनही करू नका दुर्लक्ष

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More