पुणे महाराष्ट्र

बारामतीतून महादेव जानकरांचा पत्ता कट होणार?; मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

पुणे | बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानं रासपचे महादेव जानकर यांचा पत्ता कट होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मागील निवडणुकीत आम्ही 42 जागा जिंकल्या यावेळी एक जागा जास्त जिंकू मात्र एकही कमी जिंकणार नाही, असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं होतं. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी 43 वी जागा बारामतीची असेल, असं म्हटलं आहे.

बारामतीत मागील निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढलो असतो तर आम्हाला विजय मिळाला असता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, बारामतीतून पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर रासपच्या चिन्हावर सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढले होते, भाजप त्यांना यावेळी संधी देणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बारामतीत यंदा कमळच फुलणार, देवेंद्र फडणवीसांनी केली सिंहगर्जना

राज ठाकरेंच्या उपस्थितीत 500 आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न

सत्ता कशी मिळवावी हे प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावं-रामदास आठवले

आसाममध्ये मोदींना दाखवले काळे झेंडे; मोदी गाे बॅकच्या दिल्या घोषणा

राष्ट्रवादीने ठरवलंय, कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांना पाडायचं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या