बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार”

कोल्हापूर | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये पहिल्या मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाली आहे. पाऊस असताना देखील या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र समोर येत आहे.

या आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रकाश आंबेडकर,पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. ‘नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आणि आधीच्या सरकारने दिलेल्या सर्व सवलती पुन्हा मिळेपर्यंत होणाऱ्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, या आंदोलनात धनंजय महाडिक, संजय महाडिक, विनय कोरे, प्रकाश अबिटकर, चंद्रकात जाधव, ऋतुराज पाटील, विनय कोरे, राजू आवळे या सर्व लोकप्रतिनिधीनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या सर्व लोकप्रतिनिधीनी आपलं म्हणणं या आंदोलनावेळी मांडलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मराठा समाजासाठी हा स्वाभिमानाचा लढा – प्रकाश आंबेडकर

‘डाॅक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर उपचार करणार नाही’; आयएमएचा समाजकंटकांना इशारा

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात

काळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात हिरव्या बुरशीचा पहिला रूग्ण

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More