जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू!

सिंधूदुर्ग | राज्य आणि जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना लोकांच्या मनातून उद्ध्वस्त करू, असं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते वैभववाडी येथे झालेल्या सभेत बोलत होते.  

विकासात भरारी मारणारा आपला जिल्हा 6 क्रमांकावर होता. मात्र गेल्या साडेचार वर्षात पिछाडीवर गेला आहे. यास शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष जबाबदार आहेत, असं त्यांनी म्हटलं. 

40 वर्षे राजकारणात आहे. सर्व पक्षांचे राजकारण जवळून पाहिले. परंतु कोणताही पक्ष दीन-दुबळ्या, जनसामान्यांच्या हिताचे राजकारण करत नाही, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, जनतेच्या हिताचा विचार करुन स्वाभिमान पक्ष काढला. म्हणून जात-धर्म विसरुन ‘कोकणी माणूस’ म्हणून स्वाभिमान पक्षाच्या पाठीशी राहा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-सत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे

-भाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार

– पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू!

-पुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत!

-स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन