Top News महाराष्ट्र मुंबई

हम तो मरेंगे सनम, तुमको भी ले मरेंगे; ‘रोझ डे’ ठरला काळजाचा थरकाप उडवणारा

मुंबई |  7 फेब्रुवारीपासून प्रेम व्यक्त करण्याचा आठवडा सुरु झाला आहे. पहिल्याच दिवशी मुंबईत प्रियकराने प्रेयसीला पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईतील जोगेश्वरीमध्ये प्रियकरानं प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. त्यानंतर प्रेयसीने पेटलेल्या अवस्थेत प्रियकराला मिठी मारली. त्यामुळे प्रियकरचा जागीच मृत्यू झाला असून प्रेयसीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजत आहे.

मृत तरुणाचे नाव विजय खांबे असून त्याचे आपल्या भावाच्या धाकट्या मेव्हणीशी गेल्या अडीच वर्षापासून प्रेमसंबंध होते. विजयला त्याच मुलीशी लग्न करायचं होतं. परंतू विजय व्यसनाच्या आहारी गेला असल्यानं प्रेयसीच्या आई-वडिलांनी त्याचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळला होता.

दरम्यान, प्रेयसीलाही नंतर विजयशी लग्न करायचं नव्हतं. विजयच्या त्रासामुळं प्रेयसीनं काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता. एक दिवस प्रेयसी घरात एकटी असताना विजय तिला भेटायला गेला. तेव्हा त्यांच्यात वाद झाला आणि पुढील धक्कादायक घटना घडली.

थोडक्यात बातम्या-

साहेबाचा कुत्रा हरवला, पोलिसांनी दिवस-रात्र एक करुन शोधला!

जवान पतीला फेसबुकवर ‘आयुष्यभराचं चॅलेंज’ दिलं, मात्र नियतीला ते मान्य नव्हतं!

दिलदार पंत! उत्तराखंडामधील पीडितांना केली मोठी मदत जाहीर

“कलाकार एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे, केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली?”

“देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या