बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काश्मीरी पंडितांवर हल्ले होण्याचं प्रमाण वाढलं आहे. दहशतवाद्यांनी अनेक हिंदू आणि काश्मीर पंडितांची हत्या केली आहे. भयभयीत होऊन अनेक काश्मीरी पंडितांनी पलायन केलं आहे. यावरून विरोधकांनी भाजपविरोधात टीकेचं रान उठवलं आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांबाबत वक्तव्य केलं आहे.

काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकचं वचन देऊ शकतो की, या कठिण काळात काश्मिरी पंडितांच्या पाठीमागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहिल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरकश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखवण्यात आली. मात्र, घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीमध्ये पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही अस्वस्थ करणारी घटना आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

दरम्यान, 1995 साली महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचे सरकार अवतरले होते तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून शिक्षणात आरक्षण दिले होते, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली. महाराष्ट्राने काश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो,असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

Rajyasabha Election| महाविकास आघाडीला दुसरा मोठा झटका

मोठी बातमी! करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या 55 जणांना कोरोनाची लागण

“महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना देखील आवडला असता”

“आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, शेंबड्या पोराला समजवतात तसं पडळकरांना समजवा”

Monsoon Update: पुढील पाच दिवसात राज्यातील ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More