नवी दिल्ली | अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाच्या लढाईत विजय मिळवला आहे. राष्ट्रीय महामार्ग हळूहळू सुरु झाले आहेत. फॅक्ट्रींमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत आपण बरंच नियंत्रण मिळवू आणि पुढे जाऊ, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
कोरोनासोबतचीच नाही त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण लढतो आहोत. त्या लढाईतही आपण जिंकू, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
भारतात विकासाचं चक्र पुन्हा गती घेईल, आम्ही सगळे मिळून आर्थिक संकटही परतवून लावू, असा विश्वास नितीन गडकरींनी यांनी व्यक्त केला आहे.
सध्या देशभरात प्रश्न उभा आहे तो कामगारांचा. त्यांची काळजी सामाजिक संस्था घेत आहेत. राज्य सरकारंही काळजी घेत आहेत, असंही गडकरी यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातम्या-
मोदी सरकारने देशाचा विश्वासघात केलाय; अखिलेश यादव यांची जोरदार टीका
आपण लढणार आपण जिंकणार; मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ मेसेज
महत्वाच्या बातम्या-
फेसबुकसोबत करार होताच जिओनं केला हा कारनामा!
आमचा उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला विरोध नाही- चंद्रकांत पाटील
Comments are closed.