पुणे | भाजप आकड्यांचा खेळ करून आभासी जगात वावरत आहे, पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा 42 वरून 84 होईल आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करू, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी व्यक्त केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी केलेलं वक्तव्य वैयक्तिक असून, याबाबत कोणीतीही चर्चा सुरू नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पुणे शहर काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्याला महापुराचा फटका बसला आहे. लोकांच्या घराचे, शेतीचे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत नागरिकांना सावरण्यासाठी सरकारने काहीही केले नसून निवडणुकीच्या धामधुमीत सरकार पूरग्रस्तांना विसरले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना पूरग्रस्तांना दमडी मिळालेली नसून, मुख्यमंत्री केवळ इनकमिंग आणि मेगाभरतीत व्यग्र आहेत, अशा शब्दांत थोरात यांनी भाजपवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या-
निवडणुकीत महायुतीला 240 ते 250 जागा नक्की मिळणार- रामदास आठवले https://t.co/fKf47fpxOR @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 9, 2019
पिंपरी-चिंचवड अॅडवोकेट्स बार असोसिएशनचा महेश लांडगे यांना पाठिंबा https://t.co/vcoWmhORJE
— थोडक्यात (@thodkyaat) October 9, 2019
आता फक्त ताजमहल बांधून देण्याचं आश्वासन देणं बाकी राहिलंय- देवेंद्र फडणवीस https://t.co/WbufSvg1cv @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— थोडक्यात (@thodkyaat) October 9, 2019
Comments are closed.