देश

केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | केंद्राने जर जनतेला मोफत लस दिली नाही, तर दिल्ली सरकार दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करुन देईल, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

भारत देशात गरीबीचं प्रमाण अधिक आहे आणि गेल्या 100 वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशा महाभयंकर महामारीचा सामना देशातील जनता करत आहे. लशीचा खर्च न परवडणारेही बहुसंख्य लोक देशात आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत द्यावी अशी मागणी केंद्राकडे केली होती. केंद्राकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो याची वाट आम्ही पाहत आहोत, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून कोविशील्ड लशीची निर्मिती केली आहे.

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यात सुरुवातीला देशातील अत्यावश्यक सेवेतील 3 कोटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजपचे सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंना दणका; पक्षाने केली मोठी कारवाई

“संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार हा बलात्कार नसतो, 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?”

“धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा, मंत्रीपदावर राहण्याचा त्यांना हक्क नाही”

‘कोरोना लसीवर विश्वास नसेल तर पाकिस्तानात निघून जावं’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

17 वर्षीय दिव्यांग मुलीवर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या