अहमदनगर महाराष्ट्र

‘आम्ही शिर्डीत जाणारच…’; नोटीस धुडकावत तृप्ती देसाई यांचा इशारा

अहमदनगर | साई मंदिरात प्रवेश करताना भारतीय पेहरावात यावं. तोकडे कपडे घालून येऊ नये, असं आवाहन साई संस्थानने केलं आहे. साई मंदिर परिसरात तशा आशयाचे फलकही लावण्यात आलेले आहेत.

साई संस्थानच्या याच आवाहनावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी साईबाबा मंदिरातील तो बोर्ड काढण्याची मागणी केली.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही तिथे येऊन काढू, असा थेट इशाराच दिला होता. मात्र त्यानंतरही हा बोर्ड हटवला गेला नसल्याने आम्ही 10 डिसेंबर रोजी हा बोर्ड काढण्यासाठी येणार असल्याचं देसाई यांनी लेखी पत्रच साई संस्थानला पाठवलं होतं. त्यानंतर तातडीने साई संस्थान आणि भूमाता ब्रिगेडच्या वादात प्रशासनाने उडी घेत देसाई यांना शिर्डीत येण्यास बंदी घातली आहे.

आठ दिवस झाले तरी साई संस्थानने ड्रेसकोडचा बोर्ड काढलेला नाही. अशा परिस्थितीत आम्हाला नोटीस बजावून शिर्डीत येण्यास प्रतिबंध केला जातो. लोकशाहीत आवाज दाबला जात आहे. तरी आम्ही शिर्डीत जाणारच, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवलंय, ते सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत”

धक्कादायक! फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या ‘या’ माजी मंत्र्याचं निधन!

“रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार, अंबानी-अदानींच्या पेट्रोल पंपावरही जाणार नाही”

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आता मिळणार ‘ही’ शिक्षा; ‘शक्ती’ विधेयक तयार करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

“भाजपने कुठलीही पालिका निवडणूक लढवावी, त्यांचा पराभव निश्चित”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या