बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर असावा ही जनतेची इच्छा”

मुंबई |  आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं चित्र आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणुका लढणार की वेगळी मोट बांधणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

राज्यात सध्या शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असल्यानं महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगल्या कामगिरीची आशा आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत सध्या राज्यातील विविध शहरांचे दौरे करताना दिसत आहेत. त्यातच त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर शिवसेनेचाच झेंडा फडकणार, असं वक्तव्य केलं आहे. तसेच महापौर देखील आमचाच असणार, असं देखील म्हटलं आहे, त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दुसरीकडे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवण्याबाबत विचार सुरु असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. पुण्यासारख्या शहरात शिवसेनेचा महापौर असावा ही पुणेकरांची इच्छा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. एकप्रकारे महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली असली तरी राज्यात ज्याप्रमाणे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे त्याच प्रकारे महापालिकेतही शिवसेनेचा महापौर असावा, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न असल्याचं दिसतंय.

शिवसेनेने महापालिका निवडणुकीबाबत अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेले काँग्रेस तसेच राष्ट्रवादी संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेवर काय भूमिका घेतात हे येत्या काळात कळू शकेल.

थोडक्यात बातम्या

“पोलिसांकडून खंडणी वसूली करून घेतली की असे राक्षस बोकाळणारच दादा”

“लोकांना कधीकधी वाटतं, अजून यौवनात मी, अजूनही मी मुख्यमंत्री”

काय बोलता? तंबाखू खायचं व्यसन 12 हजार वर्षांपूर्वीचं?

मुकेश अंबानींची ‘या’ परदेशी कंपनीत मोठी गुंतवणूक; भारतीय उद्योगक्षेत्राला होणार फायदा

“फडणवीस मुख्यमंत्री असताना खुट्ट झालं तरी बोंबाबोंब व्हायची”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More