बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्ही आमच्याकडून भारताला शक्य तेवढी मदत करू- कमला हॅरिस

वॉशिंग्टन | देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. या परिस्थितीवर भाष्य करत अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

कोरोना संक्रमणामुळे भारतात दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या धक्कादायक आणि मनाला वेदनादायी आहे. अनेक भारतीयांनी त्यांच्या प्रियजनांना गमावलं आहे, त्या सर्वांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, त्यांच्या वेदना मी समजू शकते, असं कमला हॅरिस यांनी म्हटलंय.

महामारीच्या सुरुवातीलाच आम्ही भारताला मदत केली होती. पण, सध्या भारतातील स्थिती बिकट असून आता आणखीन मदत करण्यासाठी आम्ही कठीबद्ध आहोत. या बिकट परिस्थितीत आम्ही आमच्याकडून शक्य तेवढी मदत करू, असं कमला हॅरिस म्हणाल्या. आम्ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरदेखील पाठवले आहेत. यासोबतच अमेरिकेने भारताला एन 95 मास्क तसेच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रेमेडिसवीरचे डोसही दिले आहेत. सध्याचं संकट पाहता आम्ही आणखी मदत करण्यासही तयार आहोत, असंही कमला हॅरिस यांनी सांगितलं.

दरम्यान, अनेक ठिकाणी बेड, औषधं, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन इत्यादीची उपलब्धताच नाही. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. या पार्श्वभूमीवर जगातील जवळपास 40 देशांनी भारताला मदत देऊ केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

मी काही उत्कृष्ट काम करत नाही, सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला – नितीन गडकरी

गायत्री मंत्राने कोरोना पळवणार?; मोदी सरकारचा नवा प्रयोग

“सकाळी ब्रश केल्यानंतर काहीही न खाता गोमूत्र प्या, तुम्हाला कोरोना होणार नाही”

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन; फक्त या सेवा सुरू राहतील

“नितीन गडकरींकडे जबाबदारी देण्यामागची सुब्रमण्यम स्वामींची तळमळ समजून घ्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More