बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यपालांच्या पत्रावर नवाब मलिकांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई | येत्या 5 जुलै आणि 6 जुलै या दोन दिवशी पावसाळी अधिवेशन पार पाडणार आहे. या अधिवेनासाठी अद्याप विधानसभा अध्यक्षपदाची निवड झालेली नाही. गेल्या अधिवेशनाप्रमाणे यावेळी अधिवेशन अध्यक्षाविना होऊ नये यासाठी, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा, याबद्दल यांनी सरकारला आठवण करून दिली आहे. त्यावरून आता राष्ट्रावादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपालांना प्रत्युत्तर दिलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊच, पण त्याअगोदर 12 आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण मार्गी लावा, असं म्हणतं नवाब मलिक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रावर प्रत्युत्तर दिलं आहे. विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सुचवलं आहे. निश्चितरुपाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणं आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

येत्या 5 दिवसात पावसाळी अधिवेशन येऊ घातलं असताना अद्याप विधानसभा अध्यक्षपदाबाबत कोणताही निर्णय ठाकरे सरकारने घेतला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा, याबद्दल कोश्यारी यांनी सरकारला आठवण करून दिली आहे. महाविकास आघाडीच्या खाते वाटपानुसार विधानसभा अध्यक्षपद सध्या काँग्रेसच्या खात्यात आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रानंतर 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न उपस्थित होणार हे निश्चित होतं. यावर राज्यपाल हे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहे. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे त्याचा सन्मानच आहे. पण राज्यपालांचे काम काय असते हे मला सांगायची गरज नसल्याचं नाना पटोले म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“ममतादीदींप्रमाणे सुल्तानी पद्धतीने ईडी आणि सीबीआयचा सामना करायला हवा”

उद्या गोळ्या जरी घातल्या तरी विचारांपासून मागे हटणार नाही- गोपीचंद पडळकर

आषाढीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळेच कोरोना वाढतोय- संभाजी भिडे

‘…पण तुम्ही त्या अगोदरच जेलमध्ये असाल’; निलेश राणेंचं अजित पवारांवर टीकास्त्र

“…तर किसान सभा राज्य सरकारचा कठोर प्रतिकार करेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More