बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पाकिस्तानविरुद्ध आपण कधी ना कधी हरणार’, धोनीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

मुंबई | टी-20 वर्ल्ड कप भारत विरुद्ध पाकिस्ताच्या सामन्यात पाकिस्ताननं भारतावर 10 विकेट्सनं विजय मिळवला. या पराभवानंतर भारताला मोठा धक्काच बसला आहे. सोशल मीडियावरुन चाहत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. भारताच्या पराभवानंतर आता भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपचा असून यामध्ये धोनीनं म्हटलं की, जर आज आपण पाकिस्तानविरुद्ध 11-0 नं जिंकलो आहोत, याचा तुम्हाला आनंद वाटत असेल पण पाकिस्तानविरुद्ध आपण कधी ना कधी हरणार आहोत हेही एक वास्तव आहे. धोनीचं हे वक्तव्य आता भारत पराभूत झाल्यानंतर तुफान व्हायरल होत आहे.

पुढे धोनीनं म्हटलं होतं की, तुम्ही आज हरलात, 10 वर्षांनी हरलात, 20 वर्षांनी हरलात किंवा 50 वर्षांनी हरलात, कधी ना कधी भारतीय संघही पराभूत होईल. असं नाही की तुम्ही नेहमीच जिंकणार. त्याचे हे शब्द सोशल मीडियावर आता धुमाकूळ घालत आहे.

दरम्यान, भारतानं दिलेलं 152 रनचं आव्हान पाकिस्ताननं 17.5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझमनं 51 बॉलमध्ये नाबाद 66 रन आणि मोहम्मद रिझवाननं 55 बॉलमध्ये नाबाद 79 रन करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“मोदी सरकारनं लसीकरणाची शंभरी साजरी केली, आता इंधन दरवाढीचीही शंभरी साजरी करावी”

नवनीत राणांनी साजरी केली करवाचौथ! खास फोटोज सोशल मीडियावर व्हायरल

“शाहरुख खान सर तुम्ही भारत सोडून कुटूंबासोबत पाकिस्तानात येऊन स्थिर व्हा.”

भारत कालची मॅच हरल्यानंतर पंजाबमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

परिक्षेत विद्यार्थ्याने लिहिलं असं काही की, वाचून शिक्षक गेले कोमात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More