बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अमृता आणि माझ्यात मैत्री होऊ शकली नाही कारण…’ सोनालीचा मोठा खुलासा

मुंबई | अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं (Sonalee KulKarni) नुकतंच ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिनं वैयक्तिक आयुष्यावर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. या मंचावर तिनं अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि तिच्या नात्याविषयी काही खुलासे केले आहे.

या कार्यक्रमाच्या खेळात पाहुण्यामंडळींना ज्यांचा फोटो दाखवला जाईल, त्यांच्याबद्दलच्या भानवा सांगायच्या असतात. सोनालीला अमृता खानविलकरचा फोटो दाखवण्यात आला, त्यावेळी  सोनालीला सुरवातीला काय बोलावे हे कळलंच नाही.

नंतर ती म्हणाली, तू आणि मी करिअरची सुरवात सोबतच केली. दोघींनाही एकमेकींचंं कष्ट माहीत आहे. नटरंगमध्ये आपण एकत्र काम केलं आहेे. पण त्यानंतर आपल्याला एकत्र काम करता आलं नाही.

आमच्यात काही मैत्री  नाही, परंतु एकत्र काम केलं असतं तर ती होऊ शकली असती. पण लोकांना दोन यशस्वी लोकांना एकत्र पाहायला आवडत नाही. काही समज गैरसमज झालेही असतील, पण इतक्या वर्षानंतर आपण एकमेकींना समजून घेऊ शकतो. आपण एकत्र काम केलं तर आपल्यात मैत्री होईल, असंही सोनाली यावेळी म्हणाली.

थोडक्यात बातम्या – 

‘घरात पार्टी सुरू असताना शाहरूख मात्र…’, गौरी खानचा नवऱ्याबद्दल मोठा खुलासा

‘एवढा लाळघोटेपणा करणारा आमदार…; किशोरी पेडणेकर आक्रमक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More