उस्मानाबाद | ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू इंदुरीकर महाराजांच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. तसेच सरकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करणार नाही, असं ते म्हणाले आहेत.
दोन तासांच्या भाषणात एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो. माझ्याकडून काही शब्द चुकीचे जाऊ शकतात तसेच ते इंदुरीकरांकडूनही जाऊ शकतात. त्यांना या प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र, नोटीस पाठवली म्हणजे गुन्हा दाखल होईल असं नाही, असंही ते म्हणाले आहेत.
बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला की त्याला पकडणे आणि त्यावरुन रान उठवण्याची आपल्याला सवय लागली आहे. ही सवय आपल्याला बदलावी लागेल, असंही ते म्हणाले आहेत.
कायदा सगळ्यासाठी सारखा आहे त्यामुळे इंदुरीकरांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
“महाराजांनी फक्त आवाज द्यावा आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या समर्थनार्थ उतरू”
सैन्यात महिलांनाही समान अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
महत्वाच्या बातम्या-
‘शिवाजीचे उदात्तीकरण: पड्यामागचे वास्तव’ पुस्तकावर बंदी घाला; भाजपची मागणी
मागच्या जन्मी पाप केलं तो ‘नगरसेवक’ आणि महापाप करतो तो ‘महापौर’ होतो- देवेंद्र फडणवीस
इंदुरीकर महाराज बोलले त्यात गैर काय?- रुपाली पाटील
Comments are closed.