‘आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही’; राज ठाकरेंचा पुन्हा गंभीर इशारा
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनेक दिवसांपासून भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज्यात गदारोळ निर्माण झाला आहे. भोंग्याचा वाद चिघळत चालला असतानाच आता राज ठाकरे यांनी एक पत्रक जारी केलं आहे.
देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे, अशा आशयाचं पत्रक राज ठाकरे यांनी शेअर केलं आहे.
आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. त्यामुळे उद्या काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार पाहता मुंबईतील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा ताफा वाढवण्यात आला आहे.
सभी को आवाहन pic.twitter.com/9yZyxkiSt3
— Raj Thackeray (@RajThackeray) May 3, 2022
थोडक्यात बातम्या –
”…त्यासाठी कुणाच्याही परवानगीची वाट पाहू नका’; मुख्यमंत्र्याचे आदेश
मोठी बातमी ! राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसैनिकांची गर्दी, पोलिसांचा ताफा वाढवला
“राज्याच्या बाहेरुन काही गुंड आणून मुंबईत गडबड करण्याचा डाव”
चिडलेल्या न्यूज अॅंकरनं अभिनेत्याला काढलं स्टूडिओतून बाहेर, पाहा ‘तो’ व्हिडीओ
अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर सोन्याच्या दरात घसरण, वाचा ताजे दर
Comments are closed.