देश

“उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता आणल्याशिवाय शांत बसणार नाही”

लखनऊ | उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विचाराचं सरकार सत्तेत आणल्याशिवाय शांत बसणार नाही, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते लखनऊमध्ये काँग्रेसच्या रॅलीला संबोधित करत होते.

उत्तर प्रदेश हे देशाचं ह्रदय असून येथे काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे, प्रियांका गांधी आणि मी फ्रंट फूटवर लढणार आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश, देशातील इतर राज्ये आणि हवाई दलाचा पैसा चोरल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

दरम्यान, देश का चौकीदार चाेर है या वक्तव्याचा राहुल गांधींनी पुनरुच्चार केला आहे. लखनऊ येथील रॅलीत राहुल गांधी राफेलची प्रतिकृती घेऊन सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या-

गडकरीजी, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी ठोकणार?; काँग्रेसचं गडकरींना आव्हान

नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान असल्यासारखं वागतात- अरविंद केजरीवाल

देशसेवेसाठी प्रियांकाला देशाच्या हवाली केलंय…. राॅबर्ट वाड्रांनी लिहिली भावुक पोस्ट

प्रियांका गांधींच्या एंन्ट्रीमुळं सपा-बसपानं घेतला मोठा निर्णय??

मी अपयशी, तर मग महाभेसळीची गरज काय?- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या