Top News

आम्ही करु शरद पवारांचे रक्षण; महाराष्ट्र केसरी सरसावले!

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची केद्र सरकारने सुरक्षा हटवली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय. त्यातच आता महाराष्ट्र केसरीकडूनही प्रतिक्रिया आली आहे.

शरद पवार आमचे आधारस्तंभ आहेत. केंद्र सरकाराने त्यांची सुरक्षा काढून घेतली तर आम्ही दिल्लीत जाऊन त्याच्या बंगल्याबाहेर थांबू. त्यांना संरक्षण करु, असं महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम म्हणाले आहेत.

केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय निंदनीय आहे. त्यांना सरकारी संरक्षणाची गरज नाही. शरद पवारांना आम्ही बजरंग बली हनुमानाच्या ठिकाणी मानतो. ते आमचे दैवत आहेत. त्यांचं संरक्षण काढून त्यांचा अपमान केलाय. त्याचं उत्तर देण्यासाठी तमाम मल्ल सरसावले असल्याचं आप्पासाहेब म्हणाले आहेत.

दरम्यान, पैलवानाच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या पवारसाहेबांची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो मल्ल घेतील, असंही आप्पासाहेब कदम म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या