Top News महाराष्ट्र रत्नागिरी

राज्य सरकार हम चलायेंगे, मलाई भी हम खायेंगे, असं चालणार नाही- प्रसाद लाड

रत्नागिरी | कोरोना लसीच्या वितरणाचा खर्च केंद्र सरकारने करावा, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. या मुद्द्यावरुन भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

या सरकारनं लसीच्या वितरणाचा खर्च केंद्राने करण्याची मागणी करण्यापेक्षा राज्यातील आघाडी सरकारच केंद्रात उचलून ठेवावं, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी बोलताना ते बोलत होते. ते म्हणाले की, “राज्य हम चलायेंगे आणि मलाई भी हम खायेंगे, असं चालणार नाही. आघाडी सरकारचं सध्या असंच काही सुरु आहे.”

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन चंद्रकांत पाटलांविरोधात लढले तरी चंद्रकांतदादांना पाडणं अशक्य आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढल्याने काहीच फायदा होणार नाही. मग त्या मनपा निवडणूक असो किंवा कोणतीही निवडणूक असो. कोल्हापुरातील चंद्रकांत पाटलांची ताकद काय आहे हे त्यांना कळेलच, असंही लाड यांनी म्हटले आहे.

थोडक्यात बातम्या-

ऐकून विश्वास बसणार नाही, मात्र 33 वर्षे फक्त चहा पिऊन जगतायत पल्लवीदेवी!

10 बाळांचा जीव गेल्यानंतर राज्य सरकारला जाग; दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश!

पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालये सुरु करण्याच्या निर्णयामुळे गोंधळ; खुलासा करण्याचे आदेश

जाचक नियमांचा व्हॉट्सअपला फटका; जगभरात ‘या’ अॅची क्रेझ वाढली!

बहुचर्चित टाटा अल्ट्रोजमध्ये मोठा बदल; ‘या’ तारखेला उठणार पडदा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या