बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता आम्ही पण बघणार, किसमें कितना है दम”; संजय राऊत आक्रमक

नवी दिल्ली | संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना (Parliament winter Session) राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. यामध्ये शिवसेनेच्या (ShivSena) प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) आणि अनिल देसाई (Anil Desai) यांचंही निलंबन करण्यात आलं होतं. राज्यसभेतील खासदारांचं निलंबन केल्यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) आणि केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार हल्लाबोल केला आहे.

आम्ही 12 दिवसांपासून महात्मा गांधीच्या(Mahatma Gandhi) चरणांशी बसलो होतो, आज दुसऱ्या गांधींसोबत आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आता आम्ही पाहू, किसमे कितना दम है, असं म्हणतं संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचा आवाज, आमचा आवाज, लोकशाहीचा आवाज पुर्ण देशापर्यतं पोहचायला हवा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच सरकार जोपर्यंत आमचे म्हणणे मान्य करत नाही तोवर आमचा आवाज घुमत राहिलं. आम्ही लढू, आम्ही लढत राहू. आम्ही झुकणार नाही, आम्ही घाबरणार नाही आणि  हाच संदेश देशाला देऊ, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही अध्यक्षांकडे मागणी केली की, आम्हालाही निलंबित करा, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, अध्यक्षांनी सरकारकडे पाहून सांगितलं की, निलंबित करायला त्यांना सांगा. याचाचं अर्थ असा होतो की, अध्यक्षांचे सर्व अधिकार सरकारकडे आहेत. सरकारला वाटलं तर निलंबित करतील, सरकारला वाटलं तर निलंबन रद्द करतील, असं सांगत संजय राऊत यांनी आजपर्यंतच्या इतिहासात लोकशाहीमध्ये असा दिवस पाहायला मिळाला नसल्याचं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“प्रकरण बाहेर आलं तर फटाक्यांची माळ लागेल”, राज ठाकरेंचा नेमका रोख कुणाकडे?

“कोण कोणाला सडवतोय हे आता उद्धव ठाकरेंना कळलं असेल”

ठाकरे सरकार पडणार का?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं…

मनसेचा अजेंडा काय? राज ठाकरे म्हणतात, “सध्या आघाडीचे दिवस पण…”

भाजपच्या 12 आमदारांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More